shikshan वाचवा

* *हे गणाधीशा*
*नेई प्रकाशदेशा*

     सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण असो किंवा शाळा कॉर्पोरेटला दत्तक देणे असो सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधी असणारे विविध आदेश आणि निर्णय असो वर वर स्पर्धा आणि गुणवत्ता वाढेल. यांचं चांगलं होईल नवीन रोजगार आणि संधी मिळतील आणि बरच बरच काही.. अशा पद्धतीचं कारण देऊन आपल्यावर हे हळूहळू थोपवले जाते किंवा स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जाते. लादलं जाते.     
     याचा विचार समाजाचा संवेदनशील घटक शिक्षक म्हणून आपण करणे फार गरजेचे आहे .सर्व सरकारी  नोकऱ्यांचा कंत्राटीकरण झालं तर पगार वाढ होणार नाही .पगार वाढ नाही बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अनुषंगाने येणाऱ्या सुविधा नाही . सवेची खात्री नाही.तुम्ही आज आता नोकरीत आहात नाहीत..नो गॅरंटी..
 माझ्या स्वतःच्याच घरात मी याचा अनुभव घेतेय .               आपली मुले उच्चशिक्षित झालीत  त्यांनी शिक्षण घेतलं पण त्यांना त्यांना तश्या पद्धतीची नोकरी मिळेल का? सगळेच काय बिजनेस करू  शकत नाहीत  सगळ्यांनी व्यवसाय केला तर सेवा क्षेत्रात  कोणी जायचे ते तर .. उच्चशिक्षित तरुणांना कायम सेवेची नोकरी नाही कारण त्या नोकरीची त्यांना शाश्वतीच असणार नाही. त्यांच्या प्राथमिक गरजा तरी भागतील का? त्यांना जे शिक्षण घेतले तसे किंवा उच्चशिक्षण ते त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवंडांना  देऊ शकतील का नाही देऊ शकणार कारण खासगी शाळांची फी ..   त्यांनी सरकारी शाळेकडे जावं म्हटलं तर सरकारी शाळा तरी शिल्लक असतील का  .त्या पण बंद झाल्या असतील किंवा  कॉर्पोरेटने घेतलेल्या असतील सरकारी शाळा कॉर्पोरेटला दत्तक देण्याचा  आलेला जीआर आपण बघितलाच असेल महानगरी शहरी निमशहरी भागांमध्ये शाळांकडे भरपूर मोकळ्या जागा आहेत त्याचा येथे योग्य वापर कॉर्पोरेट स्वतःच्या फायद्यासाठी करणार कोणताही व्यावसायिक मिळालेला संधीचा फायदा न घेता फक्त समाजसेवा करेल असा आतापर्यंतचा अखंड मानवतेचा इतिहास नाहीये .तो असा अचानक कसा बदलेल खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे जिथे जागांचे भाव अब्ज आणि कोटी मध्ये आहेत तिथे लोक फक्त समाजसेवा यासाठी पैसे घालतील का. लोक किंवा कोणती संस्था किंवा कोणतीही कंपनी म्हणजे पुन्हा सुरुवातीला छान वाटणार हे. T,,& C
नावाखाली...डोईजड होणार. 
आणि मग RTE चे काय.
एकंदर .. कठीण होईल.सारे
  इंग्रजांच्या काळात  जसे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती त्याच पद्धतीने अशा अनेक कंपन्या भारतातल्या भारतात तयार होतील त्यांचा त्यांच्या संघर्षात सर्वसामान्य आपण वेठबिगार होऊ आपली पुढची पिढी आपल्याला दोष देईल .तुम्ही समंजस जागृत होतात तुम्ही विरोध का नाही केला? त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल आणि या दिशेने विचार करावा लागेल? साधे आपण गुगलवर एखादी वस्तू सर्च केली तर वारंवार आपल्या इतर सोशल मीडियावर त्या प्रोडक्ट  जाहिराती दाखवल्या जातात.हे  घ्या हेच घ्या  म्हणजे आपली सगळा  वैयक्तिक माहिती साठवली जाते वापरली जाते.  या खाजगीकरणामुळे आपल्या सर्व माहितीचा तर वापर होईलच पण आपण एक गिनीपिक होऊन जाऊ शरीराने जिवंत असलेले पण मन बुद्धी आणि सर्व बाबतीत हॅक केलेले कोणाच्यातरी द्वारे चालवले जाणारे  रोबो म्हणता येईल. यात नक्कीच मानवाचा मानवी जमातीचा किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य धोकादायक आहे
मग मानवी कल्याणाची उच्च मूल्ये न्याय, स्वातंत्र्य, समता ,बंधुता याचं काय संविधानिक मूल्याचं काय... सगळे वेगळाच दिशेने जातेआहे आणि जाणार आहे कदाचित आपल भविष्य  अवघड होईल. खाजगीकरणामुळे मनमानी फी असेल मनमानी अभ्यासक्रमाचे लादलेपण. जिथे स्वतःच्याच गरजा त्यांना  पूर्तता करता येत नसेल तिथे त्या मुलांच्या गरजा काय भागवणार आणि मग पुन्हा नव्याने संघर्ष सुरू होणार एक प्रकारची सरंजामशाही किंवा वेठबिगारी असणार .
आणि मग बळी तो कान पिळी हे ठरलेले.मी म्हणेल तसं माझंच खरं गुलामगिरीचा नाव अध्याय.
      माझे बाबा म्हणायचे शेती मती जपा. उद्या ती तुम्हाला तरील आत्ता ती नाही आहे ती कोणी करत नाही.पोरा बाळांना कामाची  कष्ट करण्याची सवय नाही. अहो ज्याची शेती आहे त्याच्या पोराला त्याचा बांध माहित नाही  काम तर लय ल
दूरचे. झाले.सगळे अवघड आहे.
      शिक्षण क्षेत्राचा जरी विचार केला तर तिथेही कंत्राटीकरण असल्यामुळे संघटना असणार नाही कारण संघटनेला काही तिथे वाव  असणार नाही. तुम्ही बॉण्ड सिस्टीम मध्ये बांधले गेलेले  पाच वर्ष करा नाही तर निघा.. करा अथवा मारा  एवढेच तुम नाही औंर  कोई
सुशिक्षित बेरोजगारांचे प्रचंड साम्राज्य पसरले बाहेर .तुम्ही नाही तर आणखी कोणीतरी असेल
 शोषण शोषण.. असंच होत राहणार त्यामुळे जिथे जिथे शक्य तिथे बोलले पाहिजे लढले पाहिजे .शोषणापर्यंत ही गोष्ट थांबणार नाहीये तर जगण्या मरण्याचा प्रश्न सुरू होणार आहे. अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजासाठी सुद्धा माणसात संघर्ष होऊ शकतो .देशात समाजात आरजक निर्माण होऊ शकते  वाढता संघर्ष मानव जातीचे देशाचं आणि एकूणच विश्वाचे कधीही भले करत नाही त्याच्यातून विध्वंस होतो आणि पुन्हा एकदा दहा वर्ष 20 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष समाज आणि तो देश मागे जातो .आपापसात युद्ध झाले  नाही किंवा संघर्ष झाला नाही तर आजूबाजूच्या देशात तो होणार  पसरणार आणि त्यातून पुन्हा एकदा जगच वेगळ्या दिशेने वाटचाल करील खूप विचार केला तरी भयंकर आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टींना सातत्याने आपल्याला विरोध करावा. लागेल बोलावं लागेल. संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष अर्थातच आपण गांधीच्या देशातले  बुद्धाचे वारसदार आहोत शांतीचे अहिंसेचे पाईक आहोत शांतता  मार्गाने संघर्ष करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे या निमित्ताने या विषयावर चिंतन करूया विचार करूया या संघर्षाला साथ देऊया बळ देऊया यश येईलच पण यश आलं नाही तर मी लढलो सुद्धा नाही..ही सल ..तरी राहणार नाही.किंवा
 मी लढलो तरी ...हे समाधान तरी.. आपल्याजवळ असेल चला लढू या संघर्ष करूया आणि यशस्वी होऊ या.
*हे गणधीशा*
*ने प्रकाश देशा*

चित्ररेखा साळुंखे जाधव
 संविधान संवादक शिक्षक.रायगड

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

technology and education and literature

अभिवादन सावित्रीबाई फुले यांना

Goverment educational GR