shikshan वाचवा

* *हे गणाधीशा*
*नेई प्रकाशदेशा*

     सरकारी नोकऱ्यांचे कंत्राटीकरण असो किंवा शाळा कॉर्पोरेटला दत्तक देणे असो सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या विरोधी असणारे विविध आदेश आणि निर्णय असो वर वर स्पर्धा आणि गुणवत्ता वाढेल. यांचं चांगलं होईल नवीन रोजगार आणि संधी मिळतील आणि बरच बरच काही.. अशा पद्धतीचं कारण देऊन आपल्यावर हे हळूहळू थोपवले जाते किंवा स्वीकारण्यासाठी प्रवृत्त केले जाते. लादलं जाते.     
     याचा विचार समाजाचा संवेदनशील घटक शिक्षक म्हणून आपण करणे फार गरजेचे आहे .सर्व सरकारी  नोकऱ्यांचा कंत्राटीकरण झालं तर पगार वाढ होणार नाही .पगार वाढ नाही बाकीच्या सगळ्या गोष्टीचा अनुषंगाने येणाऱ्या सुविधा नाही . सवेची खात्री नाही.तुम्ही आज आता नोकरीत आहात नाहीत..नो गॅरंटी..
 माझ्या स्वतःच्याच घरात मी याचा अनुभव घेतेय .               आपली मुले उच्चशिक्षित झालीत  त्यांनी शिक्षण घेतलं पण त्यांना त्यांना तश्या पद्धतीची नोकरी मिळेल का? सगळेच काय बिजनेस करू  शकत नाहीत  सगळ्यांनी व्यवसाय केला तर सेवा क्षेत्रात  कोणी जायचे ते तर .. उच्चशिक्षित तरुणांना कायम सेवेची नोकरी नाही कारण त्या नोकरीची त्यांना शाश्वतीच असणार नाही. त्यांच्या प्राथमिक गरजा तरी भागतील का? त्यांना जे शिक्षण घेतले तसे किंवा उच्चशिक्षण ते त्यांच्या मुलांना त्यांच्या नातवंडांना  देऊ शकतील का नाही देऊ शकणार कारण खासगी शाळांची फी ..   त्यांनी सरकारी शाळेकडे जावं म्हटलं तर सरकारी शाळा तरी शिल्लक असतील का  .त्या पण बंद झाल्या असतील किंवा  कॉर्पोरेटने घेतलेल्या असतील सरकारी शाळा कॉर्पोरेटला दत्तक देण्याचा  आलेला जीआर आपण बघितलाच असेल महानगरी शहरी निमशहरी भागांमध्ये शाळांकडे भरपूर मोकळ्या जागा आहेत त्याचा येथे योग्य वापर कॉर्पोरेट स्वतःच्या फायद्यासाठी करणार कोणताही व्यावसायिक मिळालेला संधीचा फायदा न घेता फक्त समाजसेवा करेल असा आतापर्यंतचा अखंड मानवतेचा इतिहास नाहीये .तो असा अचानक कसा बदलेल खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे जिथे जागांचे भाव अब्ज आणि कोटी मध्ये आहेत तिथे लोक फक्त समाजसेवा यासाठी पैसे घालतील का. लोक किंवा कोणती संस्था किंवा कोणतीही कंपनी म्हणजे पुन्हा सुरुवातीला छान वाटणार हे. T,,& C
नावाखाली...डोईजड होणार. 
आणि मग RTE चे काय.
एकंदर .. कठीण होईल.सारे
  इंग्रजांच्या काळात  जसे ईस्ट इंडिया कंपनी भारतात आली होती त्याच पद्धतीने अशा अनेक कंपन्या भारतातल्या भारतात तयार होतील त्यांचा त्यांच्या संघर्षात सर्वसामान्य आपण वेठबिगार होऊ आपली पुढची पिढी आपल्याला दोष देईल .तुम्ही समंजस जागृत होतात तुम्ही विरोध का नाही केला? त्यामुळे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागेल आणि या दिशेने विचार करावा लागेल? साधे आपण गुगलवर एखादी वस्तू सर्च केली तर वारंवार आपल्या इतर सोशल मीडियावर त्या प्रोडक्ट  जाहिराती दाखवल्या जातात.हे  घ्या हेच घ्या  म्हणजे आपली सगळा  वैयक्तिक माहिती साठवली जाते वापरली जाते.  या खाजगीकरणामुळे आपल्या सर्व माहितीचा तर वापर होईलच पण आपण एक गिनीपिक होऊन जाऊ शरीराने जिवंत असलेले पण मन बुद्धी आणि सर्व बाबतीत हॅक केलेले कोणाच्यातरी द्वारे चालवले जाणारे  रोबो म्हणता येईल. यात नक्कीच मानवाचा मानवी जमातीचा किंवा आपल्या पुढच्या पिढ्यांचे भविष्य धोकादायक आहे
मग मानवी कल्याणाची उच्च मूल्ये न्याय, स्वातंत्र्य, समता ,बंधुता याचं काय संविधानिक मूल्याचं काय... सगळे वेगळाच दिशेने जातेआहे आणि जाणार आहे कदाचित आपल भविष्य  अवघड होईल. खाजगीकरणामुळे मनमानी फी असेल मनमानी अभ्यासक्रमाचे लादलेपण. जिथे स्वतःच्याच गरजा त्यांना  पूर्तता करता येत नसेल तिथे त्या मुलांच्या गरजा काय भागवणार आणि मग पुन्हा नव्याने संघर्ष सुरू होणार एक प्रकारची सरंजामशाही किंवा वेठबिगारी असणार .
आणि मग बळी तो कान पिळी हे ठरलेले.मी म्हणेल तसं माझंच खरं गुलामगिरीचा नाव अध्याय.
      माझे बाबा म्हणायचे शेती मती जपा. उद्या ती तुम्हाला तरील आत्ता ती नाही आहे ती कोणी करत नाही.पोरा बाळांना कामाची  कष्ट करण्याची सवय नाही. अहो ज्याची शेती आहे त्याच्या पोराला त्याचा बांध माहित नाही  काम तर लय ल
दूरचे. झाले.सगळे अवघड आहे.
      शिक्षण क्षेत्राचा जरी विचार केला तर तिथेही कंत्राटीकरण असल्यामुळे संघटना असणार नाही कारण संघटनेला काही तिथे वाव  असणार नाही. तुम्ही बॉण्ड सिस्टीम मध्ये बांधले गेलेले  पाच वर्ष करा नाही तर निघा.. करा अथवा मारा  एवढेच तुम नाही औंर  कोई
सुशिक्षित बेरोजगारांचे प्रचंड साम्राज्य पसरले बाहेर .तुम्ही नाही तर आणखी कोणीतरी असेल
 शोषण शोषण.. असंच होत राहणार त्यामुळे जिथे जिथे शक्य तिथे बोलले पाहिजे लढले पाहिजे .शोषणापर्यंत ही गोष्ट थांबणार नाहीये तर जगण्या मरण्याचा प्रश्न सुरू होणार आहे. अन्न वस्त्र निवारा या प्राथमिक गरजासाठी सुद्धा माणसात संघर्ष होऊ शकतो .देशात समाजात आरजक निर्माण होऊ शकते  वाढता संघर्ष मानव जातीचे देशाचं आणि एकूणच विश्वाचे कधीही भले करत नाही त्याच्यातून विध्वंस होतो आणि पुन्हा एकदा दहा वर्ष 20 वर्ष 50 वर्ष 100 वर्ष समाज आणि तो देश मागे जातो .आपापसात युद्ध झाले  नाही किंवा संघर्ष झाला नाही तर आजूबाजूच्या देशात तो होणार  पसरणार आणि त्यातून पुन्हा एकदा जगच वेगळ्या दिशेने वाटचाल करील खूप विचार केला तरी भयंकर आहे त्यासाठी या सगळ्या गोष्टींना सातत्याने आपल्याला विरोध करावा. लागेल बोलावं लागेल. संघर्ष करावा लागेल आणि हा संघर्ष अर्थातच आपण गांधीच्या देशातले  बुद्धाचे वारसदार आहोत शांतीचे अहिंसेचे पाईक आहोत शांतता  मार्गाने संघर्ष करणे हा एकच पर्याय आपल्याकडे आहे या निमित्ताने या विषयावर चिंतन करूया विचार करूया या संघर्षाला साथ देऊया बळ देऊया यश येईलच पण यश आलं नाही तर मी लढलो सुद्धा नाही..ही सल ..तरी राहणार नाही.किंवा
 मी लढलो तरी ...हे समाधान तरी.. आपल्याजवळ असेल चला लढू या संघर्ष करूया आणि यशस्वी होऊ या.
*हे गणधीशा*
*ने प्रकाश देशा*

चित्ररेखा साळुंखे जाधव
 संविधान संवादक शिक्षक.रायगड

राष्ट्रउभारणीसाठी महत्वाचे नेल्सन मंडेला विचार

राष्ट्राध्यक्ष झाल्यानंतर  मी आपल्या सुरक्षा यंत्रणेतील अत्यंत जवळचे असलेल्या माझ्या काही निवडक सहका-यांबरोबर शहरात फिरायला गेलो होतो. फिरून फिरून भूक लागल्यानंतर दुपारचे जेवण घेण्यासाठी आम्ही एका सामान्य रेस्टॉरंट मध्ये गेलो आणि सर्वांनी जेवणाची ऑर्डर दिली.  काही वेळातच तेथील वेटर आम्ही सांगितलेल्या ऑर्डरप्रमाणे जेवण घेऊन आला. तेवढ्यात माझे लक्ष माझ्या टेबलासमोर बसलेल्या एक व्यक्तीकडे गेले. ज्याने आमच्या अगोदर जेवणासाठी ऑर्डर दिली होती आणि तो वाट पाहत होता. मी माझ्या एका सुरक्षा सैनिकाला सांगून त्यालाही आमच्याबरोबर जेवायला बोलाविले. तेवढ्यात त्याचेही जेवण आले आणि तो जेवण घेऊन माझ्याशेजारी येऊन बसला आणि लगेच खायला सुरुवात केली. जेवत असताना त्याचे हात सतत थरथरत होते. तरीही त्याने पटापट जेवण केले आणि आमचे जेवण संपायच्या आत तो तिथून निघून गेला.

तो गेल्यानंतर माझा सहकारी मला म्हणाला, "तुम्ही पाहिलंत का त्याला? तो बराच आजारी वाटत होता. त्याच्या हातापायात मुळीच त्राण नव्हते. जेवताना त्याचे हात सतत थरथरत होते."

मी म्हणालो, "नाही ते तसे नाही. आंदोलन काळात मी जेव्हा तुरुंगात होतो तेव्हा मला ज्या बरकीत ठेवले होते तिथे हा सुरक्षा रक्षक होता. माझा छळ करणे हे त्याच्यासाठी नित्याचीच बाब होती. मी काकुळतीला येऊन जेव्हा पाणी मागायचो तेव्हा हा यायचा आणि छद्मीपणे हसत माझ्या तोंडावर लघवी करून जायचा. आता राष्ट्राध्यक्ष झाल्यावर मी ही त्याला बोलावून त्याच्याबरोबर तसाच व्यवहार करतो की काय? या भीतीने तो थरथर कापत होता.

मला संधी होती पण ते माझ्या नैतिकेत बसत नाही.  #सूड_आणि_द्वेषाची भावना राष्ट्राला विनाशाकडे घेऊन जाते तर सहनशीलता राष्ट्रउभारणीला पोषक ठरते.

                    #नेल्सन_मंडेला,अध्यक्ष, दक्षिण आफ्रिका..

पिनकोड पद्धती pincode system

*भारतातील पिनकोड सिस्टिम चा जनक कोकणातील 'राजापूर' मधील शाळेत शिकलेला एक हुशार माणूस आहे... त्यांचे नाव श्रीराम भिकाजी वेलणकर...*
       *PIN म्हणजे Postal Index Number... १९७२ पर्यंत जनरल पोस्ट ऑफिसांत पत्रांवरचे पत्ते वाचून त्यांची विभागवार विभागणी व्हायची... पण त्यात बऱ्याच अडचणी यायच्या... म्हणजे एकसारख्या नावाची माणसं, एकसारख्या नावाची गावं, कधी  कुणाचं अक्षर नीट वाचता येण्यासारखं नसे... आणि हे सगळं कमी की काय म्हणून आपल्या देशभरात पत्ता लिहिण्यासाठी वापरलेल्या कितीतरी भाषा.! चुकीचे पत्ते लिहिणं हा तर काही लोकांचा जन्मसिद्ध अधिकार आहेच.!*
       *या सगळ्या अडचणीतून जात असताना त्यावर उपाय म्हणून  पोस्ट आणि टेलीग्राफ खात्यात नोकरीत असलेले श्रीराम भिकाजी वेलणकर यांनी १५ ऑगस्ट १९७२ रोजी पिन कोड पद्धत अंमलात आणली... पिनकोडमुळे बरीच कामं सोपी झाली...*
       *पिनकोडची रचना अशी आहे... पूर्ण देश ९ झोन मध्ये विभागला गेला आहे... यातले ८ झोन हे भौगोलिक विभाग आहेत... तर एक खास मिलिट्रीसाठी वापरला जातो... या मधील पहिले दोन अंक पोस्ट ऑफिस दर्शवतात... म्हणजे यातही हा तक्ता वापरता येईल...*

११, दिल्ली...*
१२ व १३, हरयाणा...*
१४  ते १६, पंजाब...*
१७, हिमाचल प्रदेश...*
१८ ते १९ जम्मू/काश्मिर...*
२० ते २८, उत्तर प्रदेश/उत्तराखंड...*
३० ते ३४ - राजस्थान...*
३६ ते ३९, गुजरात...*
४० ते ४४, महाराष्ट्र...*
४५ ते ४९ मध्य प्रदेश/छत्तीसगड...*
५० ते ५३, आंध्र प्रदेश...*
५६  ते ५९, कर्नाटक...*
६० ते ६४, तामिळनाडू...*
६७ ते ६९, केरळ...*
७० ते ७४, पश्चिम बंगाल...*
५५ ते ७७, ओरिसा...*
७८, आसाम...*
७९, पूर्वांचल...*
८० ते ८५ बिहार आणि झारखंड...*
९० ते ९९, आर्मी पोस्टल सर्व्हिस...*

       *म्हणजे सहा आकडी पिनकोडमधला पहिला अंक विभाग दाखवतो, दुसरा अंक उपविभाग, तिसरा अंक  सॉर्टींग जिल्हा आणि राहिलेले शेवटचे तीन अंक हा त्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर असतो...*
       *उदाहरणार्थ ४१३००१ हा सोलापूरचा पिनकोड आहे... यात पहिला अंक दाखवतो पश्चिम विभाग, त्यानंतर १३ हा पश्चिम विभागातल्या महाराष्ट्रातला एक उपविभाग दाखवतो, ४१३ हा अंक सॉर्टिंग जिल्हा दर्शवतो, तर शेवटचे तीन अंक ००१ हा सोलापूर जिल्ह्यातल्या विशिष्ट पोस्ट ऑफिसचा नंबर आहे...*
       *आता पत्रं लिहिणं दुर्मिळ होत चाललं असलं तरी पिनकोड सिस्टिम कधीच इतिहासजमा होणार नाही... ही अशी पद्धत शोधणाऱ्या श्रीराम भिकाजी वेलणकर यांना मानाचा मुजरा.
       *श्रीराम वेलणकर हे संस्कृत पंडित होते व पाली भाषेचे गाढे अभ्यासकही होते...*

मुलांनी बघावे असे काही चित्रपट सिनेमा

मुले आणि शिक्षकांनी बघावेत असे सिनेमे
🐥🐥🐥🐥🐥🐥
1 तारे जमीन पर 
2 एलिझाबेथ एकादशी 
3 प्रकाश बाबा आमटे
 4 टपाल 
5 श्वास 
6 कराटे किड 
7 कुंग फ़ू पांडा 
8 राजमाता जिजाऊ
 9 रमाबाई भिमराव आंबेडकर 
10 द लिजंड ओफ़ भगतसिंग
 11 भाग मिल्खा भाग
 12 मेरी कोम
13 आक्टोबर स्काय 
14 होम
 15 यलो 
16 चिलर पार्टी 
17 द किड  
18 होम अलोन
 19 तानी 
20 सिंड्रेला 
21 बेबीज डे आऊट
 22 ज जंतरम म मंतरम 
23 नाईट इन द म्युझियम 24 जबाब आयेगा
 25 वनपुरुष 
26 दहावी फ़ 
27 बभागो भूत आया
 28 Two sollutions 
29 twenty thousand leagues 
30 under the sea 
31 द ब्ल्यू अंब्रेला 32 चक दे इंडीया 
33 शाळा 
34 राजुचाचा 
35 किंग अंकल 
36 दोस्ती (हिंदी) 
40 3 इडियटस 
41 चल चले 
42 चकोरी 
43 चिंटू 
44 चिंगी 
45 I am Kalam 
46 Park 
47 graviti 
48 jurasic world 
49 सिंधूताई सपकाळ
 50 castaway 51 भगतसिंग 
52 चिमनी पाखरं 
53 the berning train
 54 Harry potter 55 mountain man 
56 शिक्षणाच्या आईचा..
 57 लोकमान्य 
58 विटी दांडू
 59 आक्टोबर स्काय 
60 मासूम 
61 क्रिश
62 एक डाव भुताचा, 
63 छोटा चेतन
64 Sound of Music
65 Children of Heaven
66 Honey I Shrunk the kids
67 Spirited Away - Miyazaki
68 The white balloon
69 My neighbour Totoro - Miyazaki animations
70 Chaplin- the kid
71 Jaagte raho
72 The court jester
73 Modern Times
74 The red balloon
75 Ice Age - 1,2 & 3 ,4
76 Good Disnoar
77 Finding nemo
78 How to tame a dragon
79 Kekis delivery
80 Born free 
81 Inside out 
82 Madagascar 
83 The king and I
84 Japanese Ghibli movies by Miyazaki
85 Mery poppins
86 Brother bear
87 Narnia all movies
88 Golmal
89 Lion king
90 Inside out,
91 big hero six, 
92 rio 
93 Karate kid
94 Home alone....
95 Real steel (robot)
96 Kunfu panda all parts
97 red balloon
98 absent minded professor
99 makdi, 
100 blue umbrella, 
101 black beard ghost
102 Black beard ghost
103 Hotel Transylvania
104 Ratatouille
105 Sarjaby 
106 Malefficent
107 Shrek
108 star wars
109 Bug's Life
110 Antz
111 sesame street
112 angoor
113 free willy
114 happy feet
115 laurel and hardy movies

technology and education and literature

अभिवादन सावित्रीबाई फुले यांना

Goverment educational GR