इयत्ता पाचवी विषय मराठी पुस्तकातील क
*शिक्षण जीवनाशी जोडण्याला*
*जाऊ लोहारदादांच्या भेटीला*
*उसर्लीखुर्द शाळेचे विद्यार्थी
इयत्ता पाचवी विषय मराठी पुस्तकातील कारागिरी हा पाठ समजून घेताना तसेच आपला परिसर आपले विज्ञान समजून घेत यांची योग्य सांगड घालत असताना रा.जि.प शाळा उसर्लीखुर्द पनवेल रायगड शिक्षिक सौ चित्ररेखा जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील पाचवीच्या विद्यार्थ्यांनी कारागीरी या पाठाचा जीवनानुभवच घेतला आज लोहारादादांच्या पालाला भेट दिली .लोहारकाम समजून घेतले व एक तासभर थांबून लोखंडापासून नेमके कोयता कुर्हाड कुदळ सुरा व इतर अवजारे कशी बनवली जातत ते पाहिले. विजयदादा या लोहारकाकांचे काम पाहिले. अवजारे नावे व प्रत्यक्ष काम बघितले हातोडा, घण ,भाता, आणि कानस ,सांडशी ,पक्कड चिमटा , दगडी कोळसा यांचे प्रत्यक्ष उपयोग मुलांना पाहता आला आणि तापत्या लोखंडावर लोहार भरभर घाव घालतात धातुचे प्रसरण अंकुचन उष्णता सुवाहकता या मागचे विज्ञान समजले विद्यार्थींना कळला खरा अर्थ घणाचे घाव या शिष्यवृत्ती परीक्षेत आलेल्या म्हणीचा आणि समजली हृद्य हेलावणारी कथा व्यथा पोटासाठी भटकणार्या या कुटुबांची .खरतर भेट छोटी पण शिकवण मोठी .छोटीशी मुलाखत घ्यायला गेलेले विद्यार्थी माणुसकीचा नवा धडा शिकून आले .विजयदादांनी मुलाखत तर दिलीच पण शिक्षणाभावी आम्हाच्या नशिबी हे अपार कष्ट आलेत म्हणून बाळांनो संधी मिळतेय शिका. पुढे जा असा मोलाचा संदेश आमच्या विद्यार्थ्यांना लोहरदादांनी दिला. तापता भाता लोखंड कोळसा घण रणरणते ऊन अतोनात कष्ट करुन कष्टप्रद जीवन मुलांना जाणवले .लोहारदादांना मदत म्हणून त्यांच्या ताईला व बाळांना शिक्षिका सौ चित्ररेखा जाधव व मुलांनी आपल्या घरुन कपडे आणून या भेट दिले तसेच मुलांना खाऊ दिला.
पाठ्यपुस्तकातल्या पाठाबरोबर धडा नव्या संस्कार मूल्यांचा अर्थात असे जीवनानुभव देणारी शाळा उसर्लीखुर्द शिक्षकवृंद विद्यार्थी पालक परिवार विद्यार्थींसाठी सतत नवे करत राहणे समृद्ध अनुभव देणे हेच या शिक्षकवृंदांचे ध्येय.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा