झाड म्हणे बनवा मज मित्र खास
झाड म्हणे बनवा मज मित्र खास
मीच जर आहे तुमचा प्राणवायू श्वास
लागवडीचा जरा होईल तुम्हा त्रास
देईन आनंदाचा सदोदीत सहवास ..1
झाड म्हणे बनवा मज मित्र खास..
थकल्या भाग जीवा सावलीची आस
तहानल्या जीवा पाण्याचा देईन ग्लास
पक्षीगुजन करील आंनदी तव मनास
पडता दृष्टीला हिरवळ होई आरास
झाड म्हणे बनवा मज मित्र खास
मीच अन्न अन् निवारा धारापाऊस
मीच औषधी मीच स्नेही अन् श्वास
मीच इंधन मीच शेवटी तव सरणास
माझ्या विन सृष्टीचा अपुरा प्रवास
झाड म्हणे बनवा मज मित्र खास
मीच दातेपण मीच स्वच्छंद सुवास
विश्वतारक संजीवन हाच विश्वास
वैराण धरेला नित माझीच नित आस
मी जगाचा वर्तमान भविष्य इतिहास
झाड म्हणे बनवा मज मित्र खास
म्हणून द्या पूर्णत्व सकल संकल्पास
वृक्षलतेने सजवा करा हिरवी आरास
प्राणीमात्रा न काही उणे चराचरांस
मी तत्पर भरभरुन सम सर्व देण्यास
झाड म्हणे बनवा मज मित्र खास
सौ चित्ररेखा जाधव रायगड
दि.3/6/2021
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा