माझा मुलगा उमेश .एकुलता एक असल्याने त्याला सर्वांशी जुळवून घेता यावे म्हणून लहानपणापासूनच मित्र भरपूर खेळ खाऊ दंगा मस्ती रेलचेल प्राणीमित्र तर जाणीवपूर्वक मी आणले पाळले .तो सतत त्यांच्याशी जवळीक काळजी घ्यायचा त्या कोंबड्या कुत्रे मांजर पारवा या प्राणी पक्ष्यांना बघायला मुले पालक माझ्या घरी येत कारण काँलनीत इतर पालक मुलांसाठी हे करत नसत.वेळ मिळेल तसा तो माझ्या शाळेत येई त्यामुळे ती मुले आमच्या उमेशचे मित्र एकदा ससा कासव गोष्टीवरुन विषय निघाला वर्गात कासवांच्या गप्पा रंगल्या आमच्या पेण भागात पावसाळी शेताच्या बांधावर कासव सापडायचे .माझ्या वर्गातल्या एका मुलाने छोटे कासव मला दिले मँडम हे पाळा उमेशला आवडेल .मी ही ते घरी आणले खूप आनंद झाल्या उमेशला त्यांने दोन दिवस खूप काळजी घेतली त्या कासवाची तिसऱ्या दिवशी मात्र बाबांसोबत माझी शाळा सुटण्याआगोदरच शाळेत आला आणि रडत रडतच म्हणाला आई तु जशी मी इकडे तिकडे गेलो की शोधतेस मग या कासवाची आईपण याला शोधत असेल रडत असेल यालाही याच्या आईची आठवण येत असेल .पिशवीत आणलेले पिल्लू हात घेत आताच्या आता चल आणि हे जिथे सापडले तिथे सोडूया हे जाईल त्यांच्या आईकडे .मुलांनी समजावले असे नाही रे उमेश राहील तुमच्या घरी आमच्या तळ्यात शेतात आहेत कासवे .असेच सोडले तर आणखी कोणी नेईल भाजून खाईल .पण उमेश ऐकेना शेवटी सर्वानुमते गावच्या विहरीत भरपूर कासव आहेत तिथे हे पिल्लू सोडायचे हा माझ्या वर्गातील मुले उमेश यांनी निर्णय घेतला.दूरवर चालत तो मुलांसोबत गेला ते कासव सोडून आला .रात्री गोष्ट सांगताना मला म्हणाला .त्या विहरीत त्यांची आई असेल का ग मम्मी त्याला त्यांचे नातेवाईक तर भेटले असतील विहरीत त्याला छान वाटत असेल न किती नितळ निर्मळ असतात मुले आणि त्यांचे भावविश्व. हे लिहताना आजही माझे डोळे भरलेत.🙏🏻
चित्ररेखा जाधव रायगड पनवेल
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा