आषाढी एकादशी वारी 2020

*विठाई आस तुझ्या दर्शनाची खरी*... 

विठाई सांगू माऊली ग आजची वारी
वाटली सगळीच रे  सुनीसुनी सारी
देवा  कमीच मानस तुझ्या  गाभारी //१//
विठाई आस तुझ्या दर्शनाची खरी..

करमलं का रखुमाई तुला मंदिरी
हौशे नवशे गौशी आपआपल्या घरी
नाही कुणी नाचले चंद्रभागेतीरी
विठाई .आस......

 नाही सोहळा रिंगण गजर भारी
दुमदुमला ना टाळ मृदुंग दरबारी
रंगली अबीरबुक्याने  ना  पंढरी //२//
विठाइ  आस...

तुझ्या  भेटीविना कसली रे वारी
TV ,video तुझ दर्शन झाले भारी
मनाली आली बघ जरा उभारी//३//
विठाई आस...

 तु  आलास आमच्या घरीदारी
 योद्धाच दावलीस ओळख खरी
'स' ची पंचाक्षरी दावलीस न्यारी//3//
विठाई आस..

 पर्यावरण रक्षणाची घेऊ खबरदारी
समता ममता मूल्ये रुजवू घरोघरी
मग रंगेल रे वारकर्यासह  नवी वारी//4//
विठाई. आस..

 सौ चित्ररेखा रविंद्रनाथ जाधव
रायगड पनवेल.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

technology and education and literature

अभिवादन सावित्रीबाई फुले यांना

Goverment educational GR